काश्मीरची 25 वर्षीय आयेशा अझीझ ठरली भारतातील सर्वात तरुण महिला पायलट

- Advertisement -

नवी दिल्ली: काश्मीर खोऱ्यातील 25 वर्षीय तरुणी आयेशा अझीझ ही सर्वात तरुण भारतीय महिला पायलट ठरली आहे. आयेशा अझीझला वयाच्या 15 व्या वर्षी विमान चालवण्याचा परवाना मिळाला होता. आयोशानं वयाच्या 16 व्या वर्षी आयेशा अझीझनं मिग-29 जेट विमान उडवण्याच प्रशिक्षण रशियाच्या सोकोल विमानतळावर घेतलं होतं.

आयेशा अझीझ तिच्या यशाबद्दल बोलतना सांगते,काश्मिरी महिला चांगलं काम करत आहेत. काश्मीरमधील प्रत्येक तरुणी आणि महिला डॉक्टर बनत आहे किंवा पदव्यत्तर शिक्षण घेत आहे. काश्मिर खोऱ्यातील लोक चांगलं कांम करत आहेत, असं ती म्हणते. आयेशा अझीजनं बॉम्बे फ्लायिंग क्लब येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. आयेशानं तिला व्यावसायिक परवाना 2017 मध्ये मिळाल्याचं सांगितलं.

आयेशा अझीझ

- Advertisement -

पर्यटनाची आवड आणि विमान प्रवासाबद्दल आवड असल्यानं या क्षेत्रातील शिक्षण घेतल्याचं आयेशा अझीझनं सांगितले. यासाठी मी अनेक जणांना भेटले. पायलट होणे म्हणजे कार्यालायत बसून काम करण्यासारख नाहीय. पायलट झाल्यानं सतत नवीन ठिकाणांना भेटी देण्यासाठी तयार राहावं लागतं. तिथं नवीन वातावरण, नवे लोक भेटतात, असं आयेशा अझीझंनं सांगितले.

पायलट होण्यासाठी काय लागतं?

आयेशा अझीझ या व्यवसायात येण्यासाठी तुमची मानसिक स्थिती मजबूत लागते असं सांगते. कारण, तुमच्या सोबत 200 प्रवासी प्रवास करत असतात, त्या सर्वांची जबाबदारी तुमच्यावर असते. माझ्या सर्व इच्छा आई आणि वडिलांनी पूर्ण केल्या असं आयेशा अझीझ सांगते. त्यांच्या शिवाय देशातील सर्वात तरुण महिला पायलट बननं शक्य झालं, असं ती सांगते. आयेशा तिच्या वडिलांना रोल मॉडेल मानते.

- Advertisement -