अयोध्या : राम मंदिराचे भूमिपूजन एप्रिलमध्ये

- Advertisement -

Ram Mandir, Bhoomi Pujan, Ayodhyaअहमदनगर : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन ३० एप्रिल रोजी करण्यात येईल. अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आज दिली. ४ एप्रिल रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक होणार आहे.

श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पूर्णपणे वैदिक पद्धतीने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असेही स्वामींनी सांगितलं. श्रीराम जन्मभूमी मंदिराचा सध्याचा जो आराखडा आहे तो ९०% स्वीकारला गेला आहे. त्यात अजून मंदिराची भव्यता करण्याचे नियोजन आहे. तीन वर्षात मंदिर उभारणीचे लक्ष्य आहे. यासाठी निधी संकलन लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अयोध्या शाखेमध्ये मंदिर न्यासाचे खाते उघडल्यानंतर निधी संकलन सुरू होईल. अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे पाषाणात होणार असून भारतीय संस्कृतीचे संस्कार केंद्र व विश्व संस्कार राजधानी म्हणून या निमित्ताने अयोध्येचा विकास करण्याचे मंदिर न्यास समितीचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here