Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशबापरे..! श्रीदेवींची एवढी मालमत्ता!!

बापरे..! श्रीदेवींची एवढी मालमत्ता!!

मुंबई: श्रीदेवींच्या मृत्यूचा सगळ्यांनाच धक्का बसला. अद्यापही कुणाचा यावर विश्वास बसेना. त्यांचा पार्थिव दुबईतच आहेत. याची चर्चा तर सर्वत्र सुरु आहेच, परंतु त्यांच्या मालमत्तेची चर्चा सुरु झाली आहे. होय चर्चा तर होणारच कारण श्रीदेवी या २४७ कोटीच्या मालकीन होत्या. तीन बंगले, आणि ७ गाड्यांच्या त्या स्वत: मालकीन असल्यामुळे त्याचीच जोरदार चर्चा रंगत आहेत.

श्रीदेवीचीं मालमत्ता

कदाचीत तुम्हाला माहिती नसेल. श्रीदेवी या आपल्या पतीच्या मालमत्तेशिवायही वेगळी स्वतंत्र मालमत्ता बाळगून होत्या. त्या सुमारे २५० कोटी रूपयांच्या मालकीन होत्या. यात त्यांचे ३ अलिशान बंगले (जुहू, वर्सोवा आणि लोखंडवाला येथे) आणि ७ महागड्या गाड्यांचाही  समावेश आहे. सोबतच त्या लक्स आणि तनिष्क सारख्या २ जागतिक ब्रांडच्या एम्बेसडरही होत्या. बॉलिवूडमधील सूत्रांची माहिती अशी की, त्या एका चित्रपटासाठी कमीत कमी ३.४ ते ४.५ कोटी रूपये इतके मानधन घेत होत्या. त्यांच्या संपत्तीत पती बोनी कूपरची कोणतीही भागिदारी नव्हती.

मालमत्तेत २४ टक्यांनी वाढ….

२०१८ मध्ये श्रीदेवी यांची मालमत्ता ३५ मिलियन डॉलर म्हणजे, २२७ कोटी रुपये इतकी झाली होती. याशिवाय त्यांच्याकडे याशिवाय महागड्या लग्जरी गाड्याही होत्या. त्याच्या एकूण मालमत्तेची बेरीज करता जवळपास ती २४७ इतकी होते. आश्चर्यकारक असे की, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती ही सरासरी २४ टक्क्यांनी वाढत होती. २०११ मध्ये त्यांनी जेव्हा बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा, त्यांची वार्षिक कमाई १३ कोटी रूपयांवर पोहोचली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments