Friday, March 29, 2024
Homeदेशआरक्षण विरोधात भारतबंद: बिहारमध्ये गोळीबार-दगडफेक-रास्तारोको!

आरक्षण विरोधात भारतबंद: बिहारमध्ये गोळीबार-दगडफेक-रास्तारोको!

Bharat Bandhनवी दिल्ली-आरक्षणाच्या विरोधात सोशल मीडियावरुन १० एप्रिल मंगळवार रोजी बंदचे आवाहन करण्यात आले. त्याला बिहारमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला.पाटणा,आरा, मुझफ्फरनगर,शेखपूरसह बिहारमध्ये बंद समर्थकांकडून वाहतूक, दुकाने बंद करण्यात आली. आरा येथील श्री टोला येथे बंद समर्थकांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही ठिकाणी बंद समर्थकांवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. भोजपूर जिल्ह्यात २८ ठिकाणी बंद समर्थकांनी रास्ता रोको आणि जाळपोळ केल्याची घटना घडाली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये या ठिकाणी बंद
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी बंद पुकारण्यात आला आहे.
२. पाटण्यात सगुना येथे जाळपोळ करण्यात आली आहे. रास्तारोको करण्यात आला. फतुहा येथे रास्ता रोका केला गेला.
३. आरा : वीर कुंवर सिंह विद्यापीठाने आज होणारी लॉची परीक्षा स्थगित केली आहे.
४.नालंदा : हिलसा येथे बंद समर्थकांनी रेल्वे रोको केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्तारोको केला गेला आहे.

५.केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी देशात देशभर सतर्कतेचे आदेश दिले आहे.

एप्रिल रोजीच्या बंद दरम्यान १७ जणांचा मृत्यू
याच महिन्यात
एप्रिल रोजी आंबेडकरवादी संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावरुन भारतबंदचे आवाहन केले होते.
या
वेळी,मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानसह १० राज्यात बंदचा परिणाम दिसला होता. यावेळी झालेल्या हिंसाचारादरम्यान १७ जणांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक जणांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments