Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशराजदीप सरदेसाईंच्या वार्तांकनादरम्यान ‘भाजपाच्या गुंडाची’ आडकाठी!

राजदीप सरदेसाईंच्या वार्तांकनादरम्यान ‘भाजपाच्या गुंडाची’ आडकाठी!

journalist, Rajdeep, BJP

मंगलोर: ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या कर्नाटक विधानसभेच्या वार्तांकनादरम्यान भाजप गुंडांनी व्यत्यय आणल्याचा प्रकार घडला. रविवारी ते नेहरू मैदानावरील भाजपच्या सभेचे वार्तांकन करत होते. याआधी देखील वेगवेगळ्या ठिकाणी भाजप समर्थक गुंडाकडून सरदेसाई यांना अशाच पद्धतीने लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी नेहरू मैदानावर सभा असल्याने माध्यमांचे अनेक पत्रकार वार्तांकनासाठी येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभुमीवर पत्रकार राजदीप सरदेसाई देखील उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना काही भाजप कार्यकर्त्यां आक्रमक होत राजदीप यांच्या कामात व्यत्यय आणला. कार्यकर्त्यांच्या मोदी, मोदी अशा घोषणा सुरू असतानाही राजदीप सरदेसाई यांनी आपले वार्तांकनाचे काम सुरुच ठेवले. अशा विरोधाच्या परिस्थितीत देखील सरदेसाई यांनी जवळजवळ १ तास आपले काम केले. पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी आल्यानंतरदेखील संबंधित कार्यकर्त्यांनी हा प्रकार सुरुच ठेवला होता. मोदी यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर सरदेसाई यांनी आपले वार्तांकन थांबवले. मात्र, तरीही कार्यकर्त्यांच्या वर्तनात फरक होत नव्हता.

पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मोदी सरकारला अनेक अडचणीचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे भाजपाच्या गुंडाकडून हेतू पुरस्कर मोदीच्या चुकीच्या कामाचे जे माध्यम पत्रकार उघडपणे भूमिका मांडतात त्यांना धमकवण्याचे, नोकरीवरुन हटविण्यासाठी दबाव टाकण्यात आलेले आहेत. राजकीय सभांच्या कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीने पत्रकारांच्या कामात अडथळा आणणाऱ्या गुंड कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांची फूस असून त्यांच्यावर नियत्रण नसल्यामुळे पत्रकारांना काम करता येऊ नये यासाठी गुंडगर्दी करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments