Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशभाजप आणि बजरंग दल आयएसआयला पैसे देते : दिग्विजय सिंह

भाजप आणि बजरंग दल आयएसआयला पैसे देते : दिग्विजय सिंह

कांग्रेसचे वरीष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भाजप आणि बजरंग दलाला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय पैसे देते, याकडे थोडं लक्ष द्या, असा धक्कादायक आरोप दिग्विजय सिंह यांनी भाजपावर केला आहे.

दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावरुन सध्या संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच भाजप समर्थकांकडूनही सिंह यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.“पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी मुस्लीम कमी आणि गैर मुस्लीम अधिक काम करत आहेत”, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.दिग्विजय सिंहाच्या या वादग्रस्त वक्तव्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली. “दिग्विजय सिंह चर्चेत राहण्यासाठी असं वक्तव्य करत आहेत. ते आणि त्याचे नेते पाकिस्तानची भाषा बोलतात. भाजप आणि आरएसएसची देशभक्ती सर्व जगाला माहित आहे”, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी केलेले ट्वीट
नुकतेच मध्य प्रदेशच्या पोलिसांनी दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याच्या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली होती. यावर दिग्विजय सिंहने कमलनाथ सरकारला शुभेच्छा देत शिवराज सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सल्लागार अजीत डोभाल यांच्यावर निशाणा साधला.
“शिवराजजी आता सांगा देशद्रोही कोण आहे? पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरविणाऱ्यांना वाचवणारा देशद्रोही आहे की नाही? अमित शाह, अभिजीत डोभालजी देशद्रोही तर तुमच्या घरात आहेत”, असं ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केले होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments