Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशनिर्भयाच्या दोषींना वाचवण्यासाठी भाजपाकडून पाठराखण; निर्भयाच्या आईचा आरोप

निर्भयाच्या दोषींना वाचवण्यासाठी भाजपाकडून पाठराखण; निर्भयाच्या आईचा आरोप

Nirbhaya Mother and Accused,Nirbhaya Case,Nirbhaya
Image: DNA

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची फाशी याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठविली आहे. मात्र, यामध्ये राजकारण होत असून ज्यांनी २०१२ मध्ये आंदोलन केले, तेच आज माझ्या मुलीच्या मृत्यूवर राजकारण करत असून राजकीय फायदा घेण्यासाठी खेळत आहेत असा खळबळजनक आरोप निर्भयाची आई आशा देवी यांनी भाजपचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे.

निर्भया बलात्कार, हत्या प्रकरणातील सर्व दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी प्रयत्न करत आहेत. दोषींनी राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, या प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी रात्री राष्ट्रपतीक रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली आहे.

सहा वर्षापूर्वी निर्भयावर सामूहिक बलात्कार व झाली होती हत्या….

दिल्लीत निर्भयावर १६ सप्टेंबर २०१२ ला सहा जणांनी चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला बसमधून बाहेर ढकलण्यात आले होते. देशभरात आंदोलने झाली होती. त्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हे आहेत आरोपी….

मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार या चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एक आरोपी राम सिंहने २०१५ मध्ये तिहार तुरूंगात आत्महत्या केली होती. एका अल्पवयीन आरोपीने तीन वर्षासाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यांनंतर २०१५ मध्ये सुटका झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments