Friday, March 29, 2024
Homeदेशभाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर बलात्कार प्रकरणी दोषी

भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर बलात्कार प्रकरणी दोषी

Kuldeep Singh Sengar,Unnao,Kuldeep Sengar,Sengar,Kuldeepनवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 2017 मध्ये अल्पवयीन तरुणीचं अपहरण करुन बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगरला दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने दोषी ठरवलं.

सीबीआय आणि आमदाराच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी 10 डिसेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. ही कार्यवाही इन-कॅमेरा झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार लखनौ येथील कोर्टाकडून ही केस दिल्लीला वर्ग करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी ऑगस्टपासून या खटल्याची नियमित सुनावणी केली.

जुलैमध्ये फिर्यादी तरुणीच्या कारला भीषण अपघात झाला होता. यामध्ये बलात्काराच्या प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेली तिची मावशी मृत्युमुखी पडली होती, तर फिर्यादी तरुणी, तिची दुसरी मावशी आणि तरुणीचा वकील गंभीर जखमी झाले होते. कार दुर्घटनेमागे सेंगर असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला होता.

कलम 120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 363 (अपहरण), 366 (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) संबंधित इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंगरच्या शिक्षेवर उद्या (मंगळवारी) युक्तिवाद होईल.

सेंगरसह भाऊ इतर नऊ जणांविरुद्ध हत्येचाही गुन्हा…

एप्रिल 2018 मध्ये तरुणीच्या वडिलांना बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुलदीपसिंह सेंगर याची ऑगस्ट महिन्यात भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. कोर्टाने या प्रकरणातील अन्य आरोपी शशी सिंग याला निर्दोष सोडलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments