Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशउद्घाटनप्रसंगी भाजपा खासदार मुरली मनोहर जोशी अधिका-यांवर संतापले!

उद्घाटनप्रसंगी भाजपा खासदार मुरली मनोहर जोशी अधिका-यांवर संतापले!

कानपूर : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नते आणि खासदार मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात एका सोलार लाइट पॅनलचे उद्धाटन प्रसंगी वेळेवर कात्री नव्हती. म्हणून हाताने फित कापली. अधिकाऱ्याने उशीरा कात्री आणल्यामुळे त्याच्याकडे रागात बघितले आणि “तु किती उद्धट माणूस” आहेत अशा शब्दात खडसावून निघून गेले. यावेळी उपस्थित सर्व नागरिक शांतपणे हा प्रकार बघत राहिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलार लाइट पॅनलच्या उद्घाटनप्रसंगी लालफित कापण्यासाठी त्याठिकाणी कात्री नव्हती. त्यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी लालफित हाताने तोडली. यानंतर एका अधिका-यांने कात्री आणली असता, त्याच्यावर ओरडले आणि म्हणाले, आता उद्धाटन झाले आहे. कात्रीचा काय उपयोग होणार नाही. किती उद्धट माणूस आहेस तू.. अशा शब्दांत त्याला झापले. तसेच, उपस्थित अधिका-यांना विचारले की, येथील व्यवस्थापक कोण आहे. तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे ना? असा सवाल करत अधिका-यांवर आगपाखड केली. दरम्यान, याआधी सुद्धा मुरली मनोहर जोशी अनेकदा सरकारी अधिका-यांवर ओरडताना दिसून आले आहेत. सध्या ते कानपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. तसेच, त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद भूषविले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments