Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशकर्नाटकात काँग्रेसला धक्का, भाजपने गड राखला!

कर्नाटकात काँग्रेसला धक्का, भाजपने गड राखला!

Within five years, the wealth of BJP ministers increasedबंगळुरू: कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता जवळपास चित्र स्पष्ट होत आहे. भाजपने 15 पैकी 12 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस 2 आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला किमान 7 जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं.

कर्नाटकातील निकालाचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्रा यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. दरम्यान, अंतिम निकाल हाती येण्याआधीच काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी सांगितलं की, मतदारांनी दिलेला कौल मान्य करावा लागेल. लोकांनी पक्ष बदलणाऱ्यांनाच निवडून दिलं आहे. आम्ही पराभव स्वीकारतो पण आम्हाला नाही वाटत की यामुळे आम्ही निराश झालो पाहिजे.

अनेक दिवस रंगलेल्या नाट्यानंतर कर्नाटकातलं कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर येडुरप्पा यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. सोमावरी या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची असून, किमान सात जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे निकालाकडे येडियुरप्पा सरकारचं लक्ष लागलं आहे. आधिच भाजपच्या हातून मोठी आणि महत्त्वाची राज्य गेल्यामुळे आता कर्नाटकात काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments