बंगाल विधानसभा निवडणूक: भाजपच्या 148 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

- Advertisement -
bjp-west-bengal-148-candidate-list-update-west-bengal-election-2021-latest-news-and-udpate
bjp-west-bengal-148-candidate-list-update-west-bengal-election-2021-latest-news-and-udpate

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 148 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. गुरुवारी आलेल्या लिस्टमध्ये मुकुल रॉय, राहुल सिन्हा आणि खासदार जगन्नाथ सरकार यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये भगवान श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांना दिल्लीमध्ये पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.

- Advertisement -

पहिल्या लिस्टमध्ये 57 उमेदवार

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 57 उमेदवारांची नावे होती. यात सर्वात मोठे नाव शुभेंदु अधिकारी यांचे होते. त्यांना ममता बॅनर्जींविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या या 57 नावांमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराचे नाव नव्हते. यावरुन असे म्हटले जात आहे की, भाजप या निवडणुीत फक्त हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नात आहे. यादीत 12 SC, 7 ST उमेदवार आहेत.

- Advertisement -