Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशसूरत मध्ये भाजपची 'पाटीलकी'

सूरत मध्ये भाजपची ‘पाटीलकी’

सूरत गुजरातची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या सूरतमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहेच, पण तिथल्या एका निकालानं मराठी माणसांनाही सुखद धक्का दिला आहे. लिंबायत मतदारसंघात भाजपच्या मराठी उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. रवींद्र पाटील यांचा ३१ हजार ९५१ मतांनी पराभव केला.

लिंबायतमध्ये मराठी मतदारांचा टक्का लक्षणीय आहे. तो लक्षात घेऊनच, भाजप आणि काँग्रेसनं मराठी उमेदवारांना तिकीट दिलं होतं. शिवसेनेचे सम्राट पाटीलही रिंगणात होते. परंतु, भाजपच्या संगीता पाटील यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठा विजय साकारला. त्यांना ९३,५८५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्रम वाहिदुल्ला अन्सारी तिसऱ्या स्थानी राहिले, तर सम्राट पाटील यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यांच्या पारड्यात ४,०७५ मतं पडली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग भाजपवर नाराज आहे आणि त्याचा फटका त्यांना सूरतमध्ये बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, सूरतमधील १६ पैकी १४ जागा जिंकून भाजपनं विरोधकांना धक्का दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments