Friday, March 29, 2024
Homeदेशताजमहाल प्रकरणी भाजपाचा यु-टर्न

ताजमहाल प्रकरणी भाजपाचा यु-टर्न

लखनऊ – भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली आहे. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत नाही. ‘ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं. ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे असे संगीत सोम म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका एकप्रकारे संगीत सोम यांच्यासाठी चपराक आहे. योगी २६ ऑक्टोंबरला आग्र्याचा दौरा करु शकतात. त्यावेळी ते ताजमहाल आणि अन्य स्थळांना भेट देतील. आग्र्याशी संबंधित १७५ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती राज्यांच्या पर्यटन विभागाशी संबंधित असलेल्या अवनिश अवस्थी यांनी दिली. ताजमहाल एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे येणा-या पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची आहे. त्यासाठी आम्ही ३७० कोटींची योजना आखली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments