नागरी पूल बांधणं हे काही लष्कराचं काम नाही-कॅप्टन अमरिंदर सिंह

- Advertisement -

मुंबई:मुंबईत रेल्वेचे पूल बांधण्यासाठी लष्कराला पाचारण केले गेले आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. लष्कर हे काही रेल्वेचे पूल बांधण्यासाठी नाही असं अमरिंदर सिंहांचं म्हणणं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म लष्कराची मदत घेण्यावर आक्षेप घेतलाय. ‘युद्धाची तयारी करणं, हे लष्कराचं काम आहे, त्यांना नागरी कामांसाठी वापरू नका’, असं ट्विट सिंग यांनी केलंय. ट्विटमध्ये त्यांनी सीतारमण यांना टॅगही केलंय. लष्कराला नागरी कामांसाठी वापरू नये या मताचा मी आहे, या अशा निर्णयांमुळे चुकीचे पायंडे पडतात, असं ते म्हणालेत. तसंच चीन युद्धाच्या आधी जनरल कौल यांनीही असंच काम केलं होतं.यामुळे खूप वाईट पद्धत पडेल असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एलफिन्सटन रेल्वे स्थानकाची पहाणी केली. यावेळी रेल्वेमंत्री पीयुष गोयल,आमदार आशीष शेलार,शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. आमदार शेलार यांनी पत्रव्दारे रेल्वे ब्रिजच्या कामाची मागणी केली होती. एक महिनापूर्वी एलफिन्सटन रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लष्कराची मदत घेण्यावरुन आक्षेप घेतल्याने ब्रिजच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पण तरी नक्की लष्कराची मदत का घेतली जाते आहे हे एकदा जाणून घेऊया

पाहूयात लष्कराची मदत घेण्यामागची प्रमुख कारणं कोणती.

– कमी वेळात काम पूर्ण करण्यात हातखंडा

– अचूक काम करून देण्याची लष्कराची ख्याती

– टेंडर प्रक्रियेला फाटा देता येतो

– कामाच्या दर्जाबद्दल शंका नाही

- Advertisement -