Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
HomeदेशCAA : लखनऊत आंदोलन पेटले; पोलीस चौकी, वाहनांची जाळपोळ!

CAA : लखनऊत आंदोलन पेटले; पोलीस चौकी, वाहनांची जाळपोळ!

Lucknow CAA protest
Image : ANI

लखनऊ: देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. लखनऊतमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. हिंसाचार सुरु असताना पोलीस चौकीला आग लावण्यात आली. मदेयगंज नंतर ठाकुरगंज येथील सतखंडा पोलीस चौकीला आग लावण्यात आली. यावेळी चौकीबाहेर उभ्या वाहनांना पेटवण्यात आलं.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यावेळी काही आंदोलकांनी मीडियाच्या ओबी व्हॅन पेटवल्या. दुसरीकडे संभल येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. अनके वाहनं पेटवण्यात आली. आंदोलकांनी लखनऊमधील डालीगंज आणि हजरतगंज परिसरात हिंसाचार केला. परिसरात दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली.

लखनऊमधील डालीगंज परिसरात आंदोलकाकडून दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. हिंसाचार सुरु असल्याने पोलिसांकडून ठाकुरगंज येथे गोळीबार करण्यात आला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, याबाबत कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments