Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
HomeदेशCAA : दिल्लीत उद्रेक; इंटरनेट, मेट्रोसेवा बंद

CAA : दिल्लीत उद्रेक; इंटरनेट, मेट्रोसेवा बंद

Metro Stop in Delhi, CAAदिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकावरुन संपूर्ण देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद करण्यात आली आहे.

भारती एअरटेल कंपनीची मोबाइल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्राकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, केंद्राने अशापद्धतीचे आदेश दिलेले असल्यास संपूर्ण दिल्लीत काही वेळात इतर मोबाइल नेटवर्क कंपन्यांचीही सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकाला विरोध करण्यात आज संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस आणि इतर भाजपविरोधी पक्षांनी मोर्चाचं आयोजन केलं आहे. देशातून या आंदोलनाला तरुणाईचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

तर आवाज आणखी बुलंद होईल…

मोदी सरकारकडून देशातील जनतेचा आवाज दाबण्याचं काम सुरू असल्याचं ट्विट काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलं आहे. तर दिल्लीत इंटरनेट आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आल्याचीही माहिती प्रियांका यांनी ट्विटमध्ये दिली आहे.


दिल्लीत आज कुणाला आवाज उठवण्याचीही परवानगी नाही, पण तुम्ही कितीही आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला तरी तितकाच मोठ्या प्रतिकाराने आवाज आणखी बुलंद होईल, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments