Friday, March 29, 2024
HomeदेशCAB : नागरिकत्व कायदा मुस्लीमविरोधी नाही : तस्लीमा नसरीन

CAB : नागरिकत्व कायदा मुस्लीमविरोधी नाही : तस्लीमा नसरीन

Taslima Nasreen,CABनवी दिल्ली: नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांत हिंसक निदर्शने सुरू आहेत. या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात 12 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काँग्रेससह काही विरोधी पक्षांनीही या कायद्याला जोरदार विरोध केला आहे. असं असतानाच, वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी नागरिकत्व कायद्याचं समर्थन केलंय. नागरिकत्व कायदा मुस्लीमविरोधी नाही, असं त्या म्हणाल्या.

नागरिकत्व कायद्यावरून ईशान्य भाग पेटला आहे. संचारबंदी झुगारून आसाममध्ये आंदोलकांनी रस्त्यावर हिंसक निदर्शने आणि जाळपोळ केली. काही ठिकाणी आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना गोळीबार सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावात आमदाराचे घर पेटवण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं गुवाहाटीच्या पोलिस आयुक्तांसह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील विमान आणि वाहतूकव्यवस्था पूर्ण कोलमडली. गुवाहाटीतील लालुंग गाव भागात पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. त्यात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. गुवाहाटी शहरातही शिलाँग रस्त्यावर आंदोलकांनी जाळपोळ केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments