Wednesday, April 24, 2024
Homeदेश‘नासा’कडून चांद्रयान 2 मोहिमेचं कौतुक "इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी"

‘नासा’कडून चांद्रयान 2 मोहिमेचं कौतुक “इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी”

इस्रोची कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, भविष्यातील अंतराळ मोहिमांचं नियोजन आपण एकत्रित करु अशी आशा आहे

राष्ट्रीय अंतराळ संशोधन आणि अंतराळ प्रशासन ‘नासा’ने भारताच्या चांद्रयान -2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. नासाने ट्विटरमार्फत चांद्रयान 2 मोहिमेची प्रशंसा केली आहे.

“अंतराळात शोधकार्य कठीण गोष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -2 उतरवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो, तुम्ही केलेल्या या कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, भविष्यातील अंतराळ मोहिमांचं नियोजन आपण एकत्रित करु अशी आशा आहे” असं ‘नासा’ ने ट्वीट केलं.

जेव्हा चंद्राच्या अवघ्या काही अंतराच्या उंचीवर चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लॅंडरशी संपर्क तुटला केव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या आणि तब्बल कोट्यावधी भारतीयांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. देशभरातच नाही तर जगभरातून इस्रोचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. या कामगिरीची नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेनेदेखील दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात सोबत काम करण्याची इच्छादेखील नासाने ट्वीटमार्फत व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments