रस्त्यांची तुलना अमेरिकेशी केल्याने मुख्यमंत्री गोत्यात!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान

- Advertisement -

वॉशिंग्टन: मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले. विशेष म्हणजे चौहान यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. शिवराज सिंह यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

वॉशिंग्टन डीसी येथील रसेल सिनेट हॉलमध्ये भारतीय दुतावासाच्या सहकार्याने पंडित दिनदयाळ उपाध्याय फोरमचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला चौहान उपस्थित होते. ‘पायाभूत सुविधांशिवाय कोणत्याही राज्याची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळेच आम्ही मध्य प्रदेशात रस्ते निर्मितीच्या कामांना प्राधान्य दिले,’ असे चौहान या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिका आणि मध्य प्रदेशातील रस्त्यांची तुलनादेखील केली. ‘मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यावर रस्त्याने कार्यक्रमस्थळी आलो. त्यावेळी मला मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले असल्याचे जाणवले,’ असेही ते म्हणाले. अमेरिका आणि मध्यप्रदेशातील रस्त्यांची तुलना केवळ गंमत नसून ते वास्तव असल्याचेही शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले.

- Advertisement -

- Advertisement -