Thursday, March 28, 2024
Homeदेशमुख्यमंत्री ममता बॅनर्जी राक्षस; भाजपच्या आमदाराची जहरी टीका

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राक्षस; भाजपच्या आमदाराची जहरी टीका

Mamata Banerjee - MLA Surendra Singhरोहानिया ( उत्तरप्रदेश ) : उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह हे वादग्रस्त विधानं करण्यात प्रसिध्द आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही पहिलीच वेळ नाही. सुरेंद्र सिंह यांनी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राक्षस आहेत. अशी जहरी टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर राक्षसी संस्कार आहेत. त्यांच्याकडे कोणतीही मूल्ये नाहीत, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून सुधारित नागरिकत्व कायद्याला होणाऱ्या विरोधाबद्दल विचारलं असता सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं की, हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्यांना त्या सुरक्षा देत आहेत. अशा नेत्याला राक्षसच म्हणू शकतो.

भाजपा देवतांचा पक्ष

भाजपा देवतांचा पक्ष आहे, तर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष राक्षसी पक्ष आहेत. असा अजब दावा या भाजप आमदार महाशयांनी केला आहे. दहशतवाद्यांना सुरक्षा देणे म्हणजे राक्षसांचं संरक्षण करण्याचा प्रकार आहे असंही ते म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments