Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशआठ वर्षांपासून कोमामध्ये असलेले काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन

आठ वर्षांपासून कोमामध्ये असलेले काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. २००८ सालापासून प्रियरंजन दासमुन्शी कोमामध्ये होते. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर मुन्शी कोमामध्ये गेले. आठ वर्ष ते कोमामध्ये होते. 

त्यांनी संसदेत पश्चिम बंगालमधील रायगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. १९७० ते ७१ दरम्यान ते पश्चिम बंगाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाचीही जबाबदारी संभाळली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments