होम देश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे बहरीनमध्ये जंगी स्वागत!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे बहरीनमध्ये जंगी स्वागत!

12
0
शेयर

मनामा (बहरीन) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी सकाळी बहरीनला पोहोचले. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. यावेळी राहुल गांधी यांचे बहरीनच्या राजधानीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. याबाबत काँग्रेसच्या वतीने ट्विटरवरुन माहिती जाहिर करण्यात आली.

राहुल गांधी हे बहरीनमधील अनिवासी भारतीयांचा संपर्क वाढविण्यासाठी दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान ते बहरीनचे पंतप्रधान प्रिंस खलिफा बिन सलमान अल खलीफा यांची भेट घेणार आहेत. आखाती देशात सर्वात जास्त अनिवासी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांची संख्या जवळपास ३५ लाखांहुन अधिक आहे. राहुल गांधींचा हा दौरा ३ दिवसांचा आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर ‘ग्लोबल ऑर्गनाइजेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजन’ या (GOPIO) संघटनेचे सदस्य देखील उपस्थित होते. तसेच राहुल गांधी बहरीनमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी काही बहरीन नागरिकांनी तर स्वत:च्या मोबाईलमध्ये राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे बहरीनमधील अनिवासी भारतीयांच्या सभेला संबोधीत करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.