Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकर्नाटकात काँग्रेसला दे धक्का; मोदींची जादू

कर्नाटकात काँग्रेसला दे धक्का; मोदींची जादू

बंगळुरु: काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरचा राहुल गांधींचा हा पहिला पराभव असेल. कर्नाटक विधानसभेच्या २२४ विधानसभा मतदारसंघापैकी २२२ जागांवर शनिवारी ७०% मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी झाली. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र सकाळी १० वाजतापर्यंत चित्र पालटले आणि भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. भाजप १११ च्यापुढे गेले आहेत. त्रिशंकू विधानसभा होईल आणि जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत राहिल ही आशाही मावळली आहे. काँग्रेसच्या हातून कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य गेले आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

कर्नाटक विधानसभा काँग्रेस भाजप जेडीएस इतर
२२४ ६८ १११ ३९ ०२

मागील निवडणुकीपेक्षा मतांची टक्केवारी जास्त, तरीही काँग्रेस नम्म्यावर
– २०१३ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१८ मध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्हींच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये १.३% वाढ झाली आहे. त्यानंतरही त्यांच्या जागा १२२ वरुन ७०-७१ वर आल्या आहेत.

काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई, भाजपला हवा दक्षिणेत प्रवेश

भाजपसाठी ही निवडणूक म्हणजे दक्षिणेत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. तर काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यांना राज्यातील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान होते. काँग्रेसच्या हातून कर्नाटक गेल्यानंतर आता पंजाब हे एकमेव मोठे राज्य आहे. त्यासोबत मिझोराम आणि पदुचेरी येथे काँग्रेसची सत्ता आहे. दुसरीकडे, देशातील ३१ राज्यांपैकी भाजप २० राज्यांमध्ये सत्तेत आहे. कर्नाटकची स्थापना झाल्यानंतर ४६ वर्षांत यंदा सर्वाधिक ७२.१३% मतदान झाले आहे. २००८ मध्ये ६५.१%, २०१३ मध्ये ७१.४५% मतदान झाले होते. म्हणजे 2008 च्या तुलनेत ६% मतदान वाढले होते. वाढत्या मतदानाचा परिणाम राज्यातील सत्ताबदलात झाला होता. काँग्रेसने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले होते.

दोन जांगावर यामुळे निवडणूक नाही
१२ मे रोजी राज्यातील २२४ पैकी २२२ जागांसाठी मतदान झाले होते. आर. आर. नगर मतदारसंघातील मतपत्रिकांचे घोटाळे आणि जयनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या निधनामुळे या दोन जागांसाठी मतदान झाले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments