Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशगुजरातमध्ये काँग्रेसचं वादळ आलंय: राहुल गांधी

गुजरातमध्ये काँग्रेसचं वादळ आलंय: राहुल गांधी

महत्वाचे…
१.काँग्रेस देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा आदर करते २. गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ आले असून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही ३. भाजपाने आपला जाहीरनामा तयार केला नाही


छोटा उदयपूर (गुजरात) भाजपवर निशाणा साधत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ आले असून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. भाजपला जनतेसाठी काय करायचे आहे, हे अजून ते सांगू शकलेले नाही. भाजपने अद्याप आपला जाहीरनामा तयार केलेला नाही. उलट निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस १० दिवसांत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धोरण तयार करेल, असे आश्वासन राहुल गांधींनी यावेळी गुजरातच्या जनतेला दिले.

राहुल म्हणाले, काँग्रेस देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा आदर करते. काँग्रेसमध्ये कोणीही पंतप्रधानांसाठी चुकीचा शब्दप्रयोग करु शकत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याबाबत काहीही बोलू शकतात. त्यामुळेच आम्ही मणिशंकर अय्यर यांच्यावर कारवाई केली.

गुरुवारी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते.

मोदींच्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांची जीभ घसरली. त्यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख नीच व्यक्ती असा केला. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटनावेळी मोदींना नीच राजकारण करण्याची गरज नव्हती असे अय्यर यांनी म्हटले होते. ‘हा अतिशय नीच प्रकारचा माणूस आहे. या माणसाकडे जराही सौजन्य नाही. अशा प्रसंगी त्यांना घाणेरडे राजकारण करण्याची काय आवश्यकता होती?,’ असे अय्यर यांनी म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments