Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशकोरोनाचा NPR आणि जनगणनेच्या कामाला फटका!

कोरोनाचा NPR आणि जनगणनेच्या कामाला फटका!

corona outbreak, NPR, Census likely to be delayedनवी दिल्ली : बहुचर्चीत वादग्रस्त राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अपडेट करणे आणि २०२१ च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज हे आता पुढे ढकलण्यात आलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यापूर्वी जनगणना आणि एनपीआर ही दोन्ही कामे १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार होती. मात्र आता पुढील आदेश मिळेपर्यंत या दोन्ही गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पुढील आदेश येईपर्यंत काम थांबवले…

गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सद्यस्थिती लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यंत एनपीआर व जनगणनाचे काम थांबविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसवर मात करता यावी यासाठी मंगळवारपासून देशात २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याचाच फटका सर्व कामांना बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments