Thursday, March 28, 2024
Homeदेशलसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार, PMच्या सीरम भेटीनंतर अदर पुनावालांची माहिती

लसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार, PMच्या सीरम भेटीनंतर अदर पुनावालांची माहिती

पुणे : कोरोनावर प्रभावी लस निर्मितीचे काम पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट Serum Institute of India मध्ये सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये विकसित करण्यात येणारी कोरोनावरील कोविशिल्ड लस Covishield vaccine ही पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीच्या तिसऱ्या चाचणीकडे लक्ष आहे. लस विकसित झाल्यावर लसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार अशी माहिती सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे.

सीरममध्ये सुरू असलेल्या कोविशिल्ड लस निर्मिती प्रक्रियेतील प्रगती, तयारीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे.

वाचा l मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न

लस साठवणूक आणि कोल्ड स्टोरेजची पुरेशी व्यवस्था आहे. प्रत्येक महिन्याला ५ ते ६ कोटी डोसची निर्मिती सुरू आहे आणि जुलै २०२१ प्रर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली.

कोविशिल्ड ही लस सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. लसीची किंमत ही सर्वांना परवडणारी असेल असंही अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments