Thursday, March 28, 2024
Homeदेशराफेल प्रकरणी न्यायालयाने चौकशीसाठी मोठा दरवाजा उघडला

राफेल प्रकरणी न्यायालयाने चौकशीसाठी मोठा दरवाजा उघडला

Court opens door for inquiry into the Rafale aircraft case
नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयामधील न्यायमूर्ती जोसेफ यांच्या टिप्पणीचा संदर्भ दिला. सर्वोच्च न्यायालयाने तपासाचे दरवाजे उघडले आहेत, असे ट्विटद्वारे म्हटले आहे. काँग्रेसकडून आता याप्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) द्वारे चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी देखील भाजपावर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाच्य निर्णयानंतर भाजपवाले आनंदोत्सव साजरा करत आहेत. मात्र, ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची नाहीतर चौकशीची आहे. तसेच, सुरजेवाला यांनी माध्यामांशी बोलताना हे देखील सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हे सिद्ध करतो की, राफेल प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने खुला केला आहे.


फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. दरम्यान, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. तसंच राहुल गांधी यांचं पंतप्रधानांविरोधात केलेली चौकीदार चोर हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण होतं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments