बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

- Advertisement -
cousin-of-geeta-and-babita-phogat-ritika-phogat-commits-suicide
cousin-of-geeta-and-babita-phogat-ritika-phogat-commits-suicide

भारतपूर: भारतीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. रितीका फोगटने आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. रितिका फक्त १७ वर्षांची होती. भारतपूर येथे बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्महत्या केली.

आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील याच कुटुंबाचा भाग होती. रितिका राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा खेळत होती. १४ मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फक्ता एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.

रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. स्पर्धेदरम्यान तेदेखील उपस्थित होते. रितिका महावीर फोगट स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी होती.

- Advertisement -

 

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here