Placeholder canvas
Friday, April 19, 2024
HomeदेशKisan Andolen : १२ दिवसांमध्ये आठ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू

Kisan Andolen : १२ दिवसांमध्ये आठ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू

नवी दिल्ली :  कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. १२ दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

शेतक-यांनी आज भारत बंद पुकारलेला आहे. आंदोलनामध्ये आणखीन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. टिकरी सीमेजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची प्रकृती सोमवारी अचानक खालावली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगढमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र या रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला काही काळ या शेतकऱ्याने उपाचारांना प्रतिसाद दिला मात्र आज (८ डिसेंबर २०२० रोजी) सकाळी उपचारादरम्यान या व्यक्तीचं निधन झालं.

मिळालेल्या माहितीनुसार हा शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून टिकरी सीमेजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनात सहभागी होता. यापूर्वी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या गज्जर सिंह नावाच्या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला होता. गज्जर सिंह यांचा मृत्युही हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.

बहादुरपगड बायपासजवळ न्यू बस स्टॅण्डजवळच त्यांचा मृत्यू झाला होता. गज्जर सिंह लुधियानामधील समराला येथील खटरा भगवानपूर गावचा रहिवाशी होता. ते ५० वर्षांचे होते. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे आले होते.

दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी आलेल्या मेकॅनिकच्या गाडीला आग लागल्याने या मेकॅनिकचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.

चारचाकी गाडीला आग लागल्याने मेकॅनिकचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलीस अधीक्षक राजेश दुग्गल यांनी जनकराज धनवाला मंडी येथील राहणारा असणारा हा तरुण आपले शेतकरी मित्र हरप्रीत, गुरप्रीत आणि गुरजंट सिंह यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बहादुरगड येथे आला होता.

आंदोलनातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी तो आला होता. रात्री सर्वजण आपआपल्या जागी झोपण्यासाठी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अचानक गाडीने पेट घेतला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments