दीपिका पादुकोनने जेएनयूत जखमी विद्यार्थ्यांची घेतली भेट

- Advertisement -

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. आस्थेने चौकशी केली. यावेळी तिच्यासोबत विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार उपस्थित होता.

देशभरात जेएनयू हल्ला प्रकरणी आंदोलन, निदर्शने सुरु आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी अद्यापही एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिला मारहाण करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी आईशी घोषसह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे प्रसिद्ध गीतकार, कवी जावेद अख्तर संतापले आहेत. ‘राष्ट्रवाद्यां’ ना आव्हान देणारी आईशी घोष हिच्यावर का कारवाई झाली हे समजू शकतो, असा सवाल पोलीस आणि प्रशासनाला विचारला.

आईशी घोष आणि इतर आंदोलकांवर एफआयआर नोंदवल्यानंतर जावेद अख्तर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. आईशी घोषविरुद्ध एफआयआर का नोंदवला गेला हे समजण्यासारखेच आहे. याचे कारण म्हणजे आईशी राष्ट्रवाद्यांना कसे थांबवू शकते? असा सवाल केला. सध्या या प्रकरणी संताप व्यक्त केला जात असून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here