Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशशेतकरी आंदोलनला पाठिंबा देणा-या ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला FIR

शेतकरी आंदोलनला पाठिंबा देणा-या ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला FIR

पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेटा थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे टि्वट केले होते.

ग्रेटा थनबर्गने मंगळवारी रात्री टि्वट करताना भारतातील शेतकरी आंदोलकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे म्हटले होते. त्याचवेळी तिने या आंदोलना संदर्भातील सीएनएनचा लेखही शेअर केला होता. रिहानाच्या पाठोपाठ ग्रेट थनबर्गने केलेल्या टि्वटमुळे जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले.

एफआयआरमध्ये ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

रिहाना, ग्रेटा थनबर्गच्या टि्वटनंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. देशात दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतातील आंदोलनाबद्दल टि्वट करणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग अंतर्गत अनेकांनी देशाच्या एकजुटीची हाक दिली आहे. शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. मतभेद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देण्यापेक्षा #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda” अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments