Friday, March 29, 2024
Homeदेशदिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी लोकशाही धोक्यात आहे असा संदेश दिला

दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी लोकशाही धोक्यात आहे असा संदेश दिला

दिल्लीतील कॅथलिक चर्चच्या मुख्य पाद्रींनी लोकशाही धोक्यात आल्याचं म्हणत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी देशभरातील इतर चर्चच्या धर्मगुरुंना पत्र लिहून हा संदेश दिला आहे.लोकशाही धोक्यात आली असताना पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपण देशासाठी प्रार्थना अभियान सुरु करायला हवं, असंही कोटो यांनी म्हटलं आहे.

संविधानाची लोकशाही तत्त्वं आणि निधर्मी रचनेला धोका निर्माण करणाऱ्या प्रक्षुब्ध राजकीय वातावरणापासून देशाला वाचवायला हवं, असं ते म्हणतात.भाजपसह संघाच्या नेत्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मोदी सरकारनं धर्मांतरांचे उद्योग बंद केल्यामुळेच पादरींमध्ये अस्वस्थता पसरल्याचा दावा संघानं केला आहे. धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी हे पत्र लिहिल्याची टीका केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments