Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशछातीठोकपणे सांगतो  CAA  मागे घेणार नाही : अमित शाह

छातीठोकपणे सांगतो  CAA  मागे घेणार नाही : अमित शाह

NRC will be implement across the country Amit Shah

लखनऊ  : देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सर्वत्र आंदोलन सुरु आहे. मात्र या कायद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठ विधान केलं. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA)  कोणाच्याही विरोधात नाही. छातीठोकपणे सांगतो, कोणत्याही परिस्थिती हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लखनऊ येथे सांगितलं.

या कायद्यामुळं मुसलमानच काय, कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचं नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळं किती विरोध करायचा आहे तो करा. असंही शाह म्हणाले. ‘सीएए’च्या समर्थनार्थ लखनऊ येथे घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या यांच्यावर निशाना साधला. ‘CAA’ वरून होणाऱ्या हिंसाचाराला हे पक्षच जबाबदार आहेत. या कायद्यामुळं मुस्लिमांचं नागरिकत्व जाईल असा खोटा प्रचार केला जात आहे. पण या कायद्यातील कुठल्याही कलमात तसं असेल तर मला दाखवून द्यावं. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, हिसकावून घेण्यासाठी नाही. राहुल बाबा, ममता दीदी, अखिलेश यादव यांनी आमच्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही अमित शाह यांनी दिलं.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments