Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशमतदानाच्या दिवशी धनंजय मुंडेंना जमीन घोटाळ्यात दिलासा!

मतदानाच्या दिवशी धनंजय मुंडेंना जमीन घोटाळ्यात दिलासा!

dhananjay munde get emotional on pankaja mundes viral videoनवी दिल्ली : आज राज्यात मतदानाची धावपळ सुरु आहे. परळीतील राडेबाजीप्रकरण ताजं असताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मात्र, मोठा दिलासा मिळाला आहे. बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार, जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यांचा दिलासा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबर म्हणजे आज मतदानाच्या दिवशी ठेवली होती. मात्र आता ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे.
धनंजय मुंडे पुन्हा परळी मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे ठाकले आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होत असतानाच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा झाल्याच्या आरोपातही त्यांचा निकाल येण्याची चिन्हं होती.
काय आहे जगमित्र साखर कारखाना प्रकरण?
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवलही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.
या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.
जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही.
रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचं सांगत त्यांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. फड यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश शासनाला देण्याची विनंती केली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments