Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशकाँग्रेसशासित राज्यात ‘हे’ दोन्ही कायदे लागू करा नका; राहुल गांधींना आवाहन

काँग्रेसशासित राज्यात ‘हे’ दोन्ही कायदे लागू करा नका; राहुल गांधींना आवाहन

Prashant Kishor ,Rahul Gandhi,NRC, CAAनवी दिल्ली : देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून गोंधळ उडालेला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना वरील कायदे काँग्रेसशासित राज्यात लागू करु नका असे आवाहन केले आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे काँग्रेसशासित राज्यात काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये सीएए आणि एनआरसी लागू होणार नसल्याची अधिकृत घोषणा करण्यात यावी, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांद्वारे एनआरसीच्या मुद्यावर प्रतिक्रिया येण्यापेक्षा काँग्रेस अध्यक्षांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली तर अधिक उचित राहील.

अमित शाह यांच्याकडून संसदेत एनआरसी विधेयक आणण्याचे आश्वासन तेव्हाच मोडू शकते जेव्हा राज्यांकडून हे लागू करण्यास नकार दर्शवला जाईल. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात देखील काँग्रेससह अन्य पक्षांकडून मतदान करण्यात आले होते, मात्र ते याचे कायद्यात रुपांतर होण्यास नाही थांबवू शकले. जर एनआरसी लागू करण्यास सर्व राज्यांनी नकार दर्शवला तर हे विधेयक थांबू शकते, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही कायदे आम्ही लागू करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची सध्यातरी चांगीलच गोची झालेली आहे. यामुळे देशात चांगलाच गोंधळ उडालेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments