Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशनीरव मोदी स्टेजवर आले तेव्हा झोपला होतात का?; शत्रुघ्न सिन्हांचा सवाल!

नीरव मोदी स्टेजवर आले तेव्हा झोपला होतात का?; शत्रुघ्न सिन्हांचा सवाल!

नवी दिल्ली: १४ ऑक्टोबरला पाटणा विद्यालयाच्या शताब्दी कार्यक्रमात मला व इतर ज्येष्ठ नेत्यांना पंतप्रधान कार्यालयाने मोदींबरोबर व्यासपीठावर जाण्यास मज्जाव केला होता. मात्र दावोससमध्ये महाघोटाळेबाज नीरव मोदीला पंतप्रधानांबरोबर व्यासपीठावर जाण्यास कशी काय परवानगी देण्यात आली ? असा प्रश्न सिन्हा यांनी विचारलाय. सिन्हा इतक्यावरच थांबले नाहीत तर नीरव मोदी पंतप्रधानांबरोबर व्यासपीठावर गेला तेंव्हा पंतप्रधान कार्यालय झोपले होते का ? कृपया याचं स्पष्टीकरण द्या. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. यावेळी सिन्हा यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सिन्हा यांनी पीएनबी बँकेत ११ हजार कोटींचा महाघोटाळा करुन परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीच्या दावोस कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल शंका व्यक्त केली आहे. पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालून महाघोटाळेबाज हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पसार झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. यावरुन भाजप व काँग्रेस आमने सामने उभे ठाकले असतानाच दावोसमधील वल्ड इकॉनोमिक फोरमच्या व्यासपीठावरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचा महाघोटाळेबाज नीरव मोदीचा फोटो व्हायरल झाला. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली. विशेष म्हणजे दावोस संमेलनाच्या आधीच पीएनबीने नीरव मोदीला महाघोटाळेबाज म्हणून घोषित केले होते. मात्र असे असतानाही ईडी व सीबीआयला चकवा देऊन नीरव मोदी दावोसमध्ये सहभागी झालाच कसा यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. पीएनबी महाघोटाळ्याची माहिती पंतप्रधानांना होती असा आरोप करत काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर खापर फोडले आहे. तर हा घोटाळा काँग्रेसच्या राज्यात झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता या वादात भाजपमधील नाराज खासदार शत्रुघन्न सिन्हा यांनींही उडी घेत पंतप्रधान कार्यालयावर फायरिंग केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments