Friday, March 29, 2024
Homeदेशपोलीस उपअधिक्षकाला दोन दहशतवाद्यांसह पकडले

पोलीस उपअधिक्षकाला दोन दहशतवाद्यांसह पकडले

indian army has given-the response to pakistanजम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्याच पोलीस उपअधिक्षकाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे अटक केलेल्या या पोलीस उपअधिक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेलं आहे. देविंदर सिंह असं या पोलीस अधिक्षकाचं नाव असून ते एअरपोर्ट सिक्युरीटीसाठी तैनात होते,  अशी प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी देविंदर सिंह मदत करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात दहशतवाद्यांसोबत कारने जात असताना देविंदर सिंह यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यासोबत सैय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू आणि  आसिफ राथर या दोन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आलीये. पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्काराने गौवरविण्यात आलं होतं. त्यावेळी ते जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एन्ट्री हायजॅकिंग पथकात कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली होती. याआधी २००१  मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी नाविद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर असून राथर हा तीन वर्षांपूर्वीच दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सिंह यांना अटक केल्यानंतर तात्काळ त्यांच्या घरी छापा मारण्यात आला असता त्यांच्या घरी ५ ग्रेनेड आणि ३ एके ४७ सापडल्या आहेत. अटक केलेल्या पोलीस उपअधिक्षकाकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments