Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द

भंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द

भंडारा: देशामध्ये ४ ठिकाणी लोकसभा आणि १० ठिकाणी विधानसभाच्या पोट निवडणुका सुरु आहेत, या दरम्यान पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत. भंडारा आणि गोंदियात तर तब्बल ४५० इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

इव्हीएम बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना ताटकळत राहावं लागत आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे, गोंदियातील ३५ केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अन्य केंद्रांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही आक्षेप घेतला असून, ते पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडणार आहेत.

भंडारा – गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १३.९० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी १२ डिसेंबर २०१७ रोजी राजीनामा दिला होता. १४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.

भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.

पालघरमध्येही ईव्हीएम बिघाड

इकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदानासाठी जास्तीचा वेळ द्यावा अशी मागणी केली जात आहे.

पालघरमधील एका केंद्रावर तर सकाळी सव्वासातच्या सुमारास बंद पडलेलं ईव्हीएम दुपारी सव्वा बारा वाजले तरी दुरुस्त झालेलं नव्हतं. त्यामुळे पाच तासांपेक्षा जास्त वेळ मतदार ताटकळत उभे राहिले. तर अनेकजण मतदान न करताच माघारी परतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments