वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, तीन प्रवाशी ठार

- Advertisement -

महत्वाचे..
१.गोव्यातील वास्को- द- गामा इथून पाटणा इथं जाणाऱ्या एक्स्प्रेसला पहाटे अपघात झाला. २.एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरून घसरले ३. चित्रकूटजवळ माणिकपूर स्टेशनच्या सिग्नलजवळ झाला अपघात


उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशमधील चित्रकूटजवळ गोव्यातील वास्को- द- गामा इथून पाटणा इथं जाणाऱ्या एक्स्प्रेसला पहाटे अपघात झाला. एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरून घसरले असून या अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर  १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे ४ वाजून २२ मिनिटांनी चित्रकूटजवळ माणिकपूर स्टेशनच्या सिग्नलजवळ हा अपघात झाला. अपघातात पटेल कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झालाय. ते बिहारला राहत होते. घसरलेले १३ डबे सोडून उरलेले ७ डबे घेऊन ट्रेन पुढे गेली. काहींना खाजगी वाहनांनीही सोडण्यात आलंय. अपघाताची चौकशी सुरू आहे.

- Advertisement -
- Advertisement -