Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशमधमाश्यांच्या हल्ल्याने वनमंत्र्यांनी काढला पळ

मधमाश्यांच्या हल्ल्याने वनमंत्र्यांनी काढला पळ

बेळगाव । शासकीय कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे, आंदोलनामुळे मंत्री, नेते मंडळी कार्यक्रम सोडून गेल्याची काही उदाहरणे आहेत. मात्र, कर्नाटकात एका शासकीय कार्यक्रमात मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे वन मंत्र्यांना कार्यक्रमातून पळ काढवा लागल्याची घटना समोर आली आहे.

बेळगाव येथील जैव विविधता उद्यानाचे उद्घाटन करण्यासाठी कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय हे व्हीटीयु विद्यापीठ परिसरात आले होते. कार्यक्रमाच्या स्थळी असलेल्या ड्रोनच्या आवाजाने बिथरल्यामुळे मधमाशा पोळे सोडून बाहेर पडल्या. सुरुवातीला मधमाशांकडे मंत्री महोदयांनी दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळेतच अचानक मधमाशांनी दिसेल त्याच्यावर हल्ला चढवला. मधमाशांच्या हल्ल्यात मंत्री महोदयही अडकले. मधमाशांच्या आक्रमणापुढे मंत्री महोदयांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले. अखेर वन मंत्री राय यांनी वन विभागाचे कर्मचारी आणि ड्रायव्हरच्या मदतीने आपली गाडी गाठली आणि तेथून पळ काढला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments