हिमाचल विधानसभा निवडणूक, प्रचाराच्या तोफा थंडावल्या!

- Advertisement -

शिमला – हिमाचल विधानसभा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. हिमाचलच्या कडाक्याच्या थंडीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांनी चांगलीच गरमी निर्माण केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आश्वासनांची खैरात वाटली.

हिमाचल विधानसभेसाठी ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे प्रचारदरम्यान दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडाक्याच्या थंडीमध्ये घाम गाळला.
प्रचारामध्ये काँग्रेसही मागे नव्हते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी शेवटच्या टप्प्यात तीन सभा घेतल्या. भाजपवर कडाडून टीका केली. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा खुद्द मुख्यमंत्री वीरभद्र सिंह संभाळत होते. यामुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आता जनता कोणाला कौल देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -