Placeholder canvas
Friday, April 26, 2024
HomeदेशCAA : हिंसक उद्रेकानंतर केंद्रीय गृहमंत्रालयात तातडीची बैठक

CAA : हिंसक उद्रेकानंतर केंद्रीय गृहमंत्रालयात तातडीची बैठक

Amit Shahनवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकावरुन संपूर्ण देशभरात हिंसक निदर्शने होत आहेत. सर्वत्र आगडोंब पसरलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयात आज संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

देशभरात नागरिक कायदा दुरुस्तीविरोधात आंदोलन,जाळपोळ सुरु आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे. राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद करण्यात आली आहे. विमानांचे उडानही रद्द करण्यात आले आहे.
भारती एअरटेल कंपनीची मोबाइल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्राकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

पण, केंद्राने अशापद्धतीचे आदेश दिलेले असल्यास संपूर्ण दिल्लीत काही वेळात इतर मोबाइल नेटवर्क कंपन्यांचीही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकाला विरोध करण्यात आज संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस आणि इतर भाजपविरोधी पक्षांनी मोर्चाचं आयोजन केलं आहे. देशातून या आंदोलनाला तरुणाईचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. लखनऊतमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. हिंसाचार सुरु असताना पोलीस चौकीला आग लावण्यात आली. मदेयगंज नंतर ठाकुरगंज येथील सतखंडा पोलीस चौकीला आग लावण्यात आली. यावेळी चौकीबाहेर उभ्या वाहनांना पेटवण्यात आलं.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यावेळी काही आंदोलकांनी मीडियाच्या ओबी व्हॅन पेटवल्या. दुसरीकडे संभल येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. अनके वाहनं पेटवण्यात आली. आंदोलकांनी लखनऊमधील डालीगंज आणि हजरतगंज परिसरात हिंसाचार केला. परिसरात दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली.

लखनऊमधील डालीगंज परिसरात आंदोलकाकडून दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. हिंसाचार सुरु असल्याने पोलिसांकडून ठाकुरगंज येथे गोळीबार करण्यात आला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, याबाबत कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments