Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशएम्सचे तीन डॉक्टर अपघातात ठार!

एम्सचे तीन डॉक्टर अपघातात ठार!

नवी दिल्ली| मथुरा येथील यमुना एक्स्प्रेस वेवर भरधाव कारने एका डंपरला दिलेल्या धडकेत दिल्लीत एम्समधील तिघा डॉक्टरांचा जागीच मृत्यू तर इतर ४ डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार चालवत असलेले डॉ. हर्षद वानखेडे यांचा आज वाढदिवस होता. ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर आग्रा येथे जात होते.

दिल्लीहून आग्राला जात असलेल्या या कारमध्ये सात जण होते. सुरीर पोलीस ठाण्याजवळ या भरधाव कारने उभ्या असलेल्या डंपरला जोरात धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकाला जाऊन धडकली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे जखमी झाले आहेत. मृत तिन्ही डॉक्टर हे एम्समधील आपात्कालीन विभागात कार्यरत होते. एम्सच्या निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष हर्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये डॉक्टर हर्षद वानखेडे, यशप्रीत काठपाल आणि हेमबाला यांचा समावेश आहे. तर अभिनव, जितेंद आणि महेश ही जखमी डॉक्टरांची नावे आहेत. जखमींना ट्रॉमातून दिल्लीला पाठवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments