Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशदिल्लीहून शेतकरी आंदोलनकर्त्यांची भरकटली 'स्वाभिमानी' एक्सप्रेस भरकटली!

दिल्लीहून शेतकरी आंदोलनकर्त्यांची भरकटली ‘स्वाभिमानी’ एक्सप्रेस भरकटली!

कोल्हापूर – नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी सोडण्यात आलेली खास रेल्वेची स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली. नियोजित मार्गाऐवजी भलत्याच मार्गावर रेल्वे गेल्याने रेल्वेचा गलथानपणा समोर आला. सकाळी ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी हाताला येईल, त्या वस्तुंची फेकाफेकी करून निषेध व्यक्त केला. रेल्वेसमोर आडवे होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हा प्रकार जाणूनबुजून करण्यात आला असा आरोपही शेतकऱ्यांनी केला.

दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. यासाठी खास रेल्वे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने गेली होती. येताना मथुरा कोटाटा मार्गे कल्याण तेथून पुणे असा मार्ग होता. मध्यरात्री मथुरेतून रेल्वे भरकटली. ती परत आग्राच्या दिशेने गेली. पहाटे ४ वाजता चहासाठी आचाऱ्याने स्टेशन कोणते आहे हे पाहिल्यानंतर चुकीच्या सिग्नलमुळे रेल्वे १६० किलोमीटर मार्ग बदलून आल्याचे लक्षात आले. शेतकऱ्यांनी स्टेशन मास्टरला विचारताच तुम्ही इकडे कुठे आलात, असा उलटा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला. रेल्वे काय आम्ही चालवतोय काय? असे सांगत शेतकऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल २ तास गोंधळ झाल्यानंतर गाडी झाशीकडे रवाना झाली. खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.
या रेल्वेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीही होत्या. आम्हाला परतीच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सागर संभू शेटे यांनी दिली. आता ही रेल्वे मनमाडच्या दिशेने धावत आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments