Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशशेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक

शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा

मुंबई: शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली  दरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आज गंभीर आरोप केला. “सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायची आहे” असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्धू वैगरे लोकं आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा.

ते कुठं फरार झालेले आहेत? पण सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे आणि त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गट जो भाजपाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्यावर गेले.

त्यांनी गदारोळ निर्माण केला आणि आज जे सगळं चित्र निर्माण झालं आहे, परत की आंदोलनात फूट पडली. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे, करून घ्या. संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसांपासून या सरकारला सर्व प्रश्नांचा उत्तर द्यावी लागतील.”

देशातील राजधानीत देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेला हिंसाचाराचा शिवसेना निषेध करते. दिल्लीतील वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी या अगोदर टीका केलेली आहे.

“दिल्लीत जे आज झालं त्याला मी राष्ट्रीय स्तरावरील लाजिरवाणी गोष्ट मानतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संपूर्ण जग देशाचं सामर्थ पाहत असताना दुपारनंतर संपूर्ण जगाने दिल्लीच्या रस्त्यांवर जे दृश्य पाहिलं. हे आंदोलकांना शोभा देत नाही किंवा सरकारलाही शोभत नाही.” असं राऊत म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments