शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले प्रकरण, कंगनाविरुद्धच्या कारवाईला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisement -
farmers-protest-issue-karnataka-hc-refusws-to-stay-proceeding-against-kangana-ranaut
farmers-protest-issue-karnataka-hc-refusws-to-stay-proceeding-against-kangana-ranaut

बेंगळुरूः तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कंगना रनौतने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले होते. आंदोलन करणारे शेतकरी नसून दहशतवादी आहेत, असे ट्विट तिने केले होते. त्यामुळे कंगनाविरोधात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.

- Advertisement -

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी कंगनाविरोधात या वादग्रस्त ट्विटबद्दल एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्याविरोधात कंगनाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisement -