Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशराम मंदिर उभारणीसाठी शिया वक्फ बोर्डाकडून आर्थिक मदत

राम मंदिर उभारणीसाठी शिया वक्फ बोर्डाकडून आर्थिक मदत

Syed Waseem Rizviउत्तर प्रदेश : राम मंदिरासाठी शिया वक्फ बोर्ड सुरुवातीपासून आग्रही होता. आता न्यायालयाच्या निकालामुळे राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली.

रिझवी म्हणाले की, भगवान राम आपल्या सर्वांचेच पूर्वज आहेत, म्हणूनच रिझवी फिल्मच्यावतीने ५१ हजार रूपयांची भेट रामजन्मभूमी न्यासकडे मंदिर उभारणीसाठी देत आहोत. भविष्यात राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर शिया वक्फ बोर्डाच्यावतीने त्यात देखील मदत केली जाईल, अयोध्येतील राम मंदिर संपूर्ण जगभरासह भारतातील राम भक्तांसाठी गर्वाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिया वक्फ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्डात राम अयोध्येच्या जागेच्या मालकीवरून वाद होत असतात. दोन्ही बोर्डाच्या मंडळींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments