Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशफक्त ९९ रुपयांत विमान प्रवास!

फक्त ९९ रुपयांत विमान प्रवास!

नवी दिल्ली: कमी दरात हवाई प्रवास अशी ओळख निर्माण करणाऱ्या एअरएशियाने प्रवाशांसाठी एक जबरदस्त ऑफर सुरु केली आहे. सोमवारपासून प्रवासी केवळ ९९ रुपयात हवाई प्रवास करु शकतील. देशातील काही मार्गांवर ही खास ऑफर एअर एशियाने दिली आहे. 

बेंगळुरू, हैदराबाद, कोच्ची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांची या देशांतर्गत मार्गावर प्रवासी केवळ ९९ रुपयात प्रवास करु शकतील, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रवासी सोमवारपासून २१ जानेवारीपर्यंत १५ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंतचे तिकीट बुक करू शकतील. या ऑफरमध्ये तिकीटाचा बेस फेअर ९९ रुपये इतका असेल. ही सलवत केवळ एअर एशियाच्या वेबसाईटवरून किंवा अॅपवरून तिकीट बुक केल्यावरच मिळणार आहे.

विदेशातील प्रवास केवळ हजार ४९९ रुपयात 

केवळ देशांतर्गत नव्हे तर १० देशांमध्ये केवळ १ हजार ४९९ या बेस फेअरवर प्रवास करता येऊ शकतो, असे कंपनीने सांगितले. या कालावधीमध्ये ऑकलँड, बाली, बॅकॉक, कुआलालंपुर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनी येथे प्रवास करु शकतील.

एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सची ५१ टक्के भागिदारी आहे. तर ४९ टक्के समभाग एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऑफ मलेशियाचे आहेत. तीन वर्षांपूर्वी एअर एशियाने भारतात हवाई सेवा देण्यास सुरूवात केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments