Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशदेशात एकाच रेशनकार्डावरून खाद्य सामान घेता येणार

देशात एकाच रेशनकार्डावरून खाद्य सामान घेता येणार

Ram vilas Paswanनवी दिल्ली: सरकार आता देशभरात ‘एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज मंळवारी दिली आहे. या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान खरेदी करता येणार आहे. एक जूनपासून देशात याची सुरुवात होणार आहे. असंही पासवान यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्री पासवान यांनी लोकसभेत याची माहिती दिली. ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात एक जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. सध्या रेशन कार्डसाठी १४ राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच लवकरच २० राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुढील एक जूनपासून एक राष्ट्र, एक रेशन कार्ड सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments