Friday, March 29, 2024
Homeदेशमाजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

sushma swaraj passes away,sushma swaraj,sushma,swarajनवी दिल्ली : भारत देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं. मंगळवारी (6 ऑगस्ट) संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची टीम जवळपास 70 मिनीटे त्यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली आणि उपचारदरम्यान रात्री 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.

सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा स्वराज यांना रात्री जवळपास 9 वाजून 35 मिनीटांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी एम्समधील डॉक्टरांना अलर्ट ठेवण्यात आले होते. सुषमा स्वराज यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना थेट आप्तकालीन कक्षात (ICU) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांची अवस्था पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आल्याचे ओळखले.

त्यानंतर डॉक्टरांनी 15 मिनिटे त्यांना CPR आणि हार्ट पंपद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर सुषमा स्वराज यांना शॉक देण्यात आला. मात्र त्याचा फारसा काही परिणाम जाणवला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना काहीही यश आले नाही आणि उपचारादरम्यान रात्री जवळपास 10 वाजून 50 मिनीटांनी त्यांची प्राणज्योत मालावली.

सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.

अश्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला भारत देश मुकला.

सुषमा स्वराज यांची कारकीर्द :

  • 14 फेब्रुवारी 1952 मध्ये हरयाणातील अंबाला छावणीमध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
  • त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली.
  • चंदीगडमधून लॉची पदवी घेतली.
  • 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला.
  • त्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. त्यांचे पती स्वराज कौशलही याच काळात सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते.
  • 1977 मध्ये त्या हरयाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या.
  • 1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या.
  • 13 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर 1998 या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला.
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2000-2003 दरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले.
  • 2003-2004 दरम्यान त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले.
  • तसेच त्यांनी दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला.
  • 2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.
  • 2014 ते 2019 या काळात सुषमा स्वराज या देशाच्या पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री होत्या.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments